Breaking News

कापड बाजार, मोचीगल्ली, सारडा गल्ली व गंज बाजार राहणार सुरु!

अहमदनगरची संपूर्ण बाजारपेठ बंद नाही

अहमदनगर/प्रतिनिधी
अहमदनगर शहरातील एका भागातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर भागात कोरोनाचा रुग्ण देखील आढळला आहे. हा निर्णय संपूर्ण बाजारपेठेशी संबंधित नाही. कापड बाजार, मोचीगल्ली, सारडा गल्ली, गंज बाजार इत्यादी प्रमुख बाजारपेठ नेहमीप्रमाणेच फिजीकल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करुन सुरू राहणार असल्याची माहिती मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली. या भागातील सर्व व्यापारी असोसिएशनने हा निर्णय घेतला असून, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता योग्य ती दक्षता घेऊन व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याचे आवाहनही व्यापारी संघटनांतर्फे करण्यात आले आहे.