Breaking News

काँग्रेसचे सोमवारी आंदोलन


मुंबई ।  पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे मात्र आपले केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसुली करत आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने केला. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. काँग्रेसच्यावतीने राज्यभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस नेत्यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळील कार्यक्रमात सहभागी होऊन चीन सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आरोप केले.