Breaking News

चिनी दबाव झुगारून रशिया भारताला देणार ’ब्रम्हास्त्र’- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा रशिया दौरा यशस्वी
मॉस्को/ वृत्तसंस्था
चीनच्या कोणत्याही आगळिकीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारतीय लष्कर सज्ज झालेआहे. सरकारने लष्कराला फ्री हँड दिला असून आता गोळीबार करण्याचे आदेश फिल्ड कमांडरकडून दिले जातील. दरम्यान, सीमेवरील शस्त्रास्त्रे सज्जता वाढवण्याचे प्रयत्न करणार्‍या भारताला रशियाने मोठा दिलासा दिला आहे. लडाख सीमावादाच्या पृष्ठभूमीवर रशिया भारताला ’ब्रम्हास्त्र’ देणार आहे.
रशियाने भारताला सर्वात घातक एस-400 हे क्षेपणास्त्र लवकरात लवकर देण्याचे आश्‍वासन दिले आहे. एस-400 जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पृष्ठभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्‍यावर आहेत. रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांनी एस-400 यंत्रणा लवकरात लवकर भारताला देण्यात येईल, असे आश्‍वासन दिलेआहे. रशियाने भारताला शस्त्रास्त्रेपुरवठा करू नये, असे आवाहन चिनी सरकारच्या एका वृत्तपत्राने केले होते. मात्र, चीनने निर्माण केलेला दबाव रशियाने झुगारला आहे.
भारतासोबत केलेले करार लवकरात लवकर पूर्ण केले जातील, असे आश्‍वासन रशियाकडून देण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दिली. रशियाच्या उपपंतप्रधानांसोबतची चर्चा अतिशय सकारात्मक झाली. कोरोना संकट काळातही रशिया आणि भारतामधील दृढ संबंध कायम आहेत. आधी करण्यात आलेले करार कायम राहतील. याशिवाय काही नव्या गोष्टीही कमीत कमी कालावधीत पूर्ण केल्या जातील, असे राजनाथसिंह म्हणाले
-------------------------------------