Breaking News

निघोज पतसंस्थेमध्ये विनातारण कर्जास प्रतिसाद : कवाद

निघोज/प्रतिनिधी : सध्या कोरोना व्हायरस मुळे बंद करण्यात आलेल्या महाराष्ट्रामध्ये बर्‍याच पैकी छोट्या व्यवसायिकांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे .परंतु त्यांचे जवळपास तीन महिने व्यवसाय बंद होते परंतु सध्या त्यांना व्यवसाय सुरु  करण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असणार्‍या व्यावसायिकांना निघोज नागरी सहकारी पतसंस्थने  व्यवसायात काही प्रमाणात हातभार लागावा यासाठी 1 लाखांपर्यंत विनातारण कर्ज दिले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे वसंत कवाद यांनी सांगितले.
निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद, व्हा. चेअरमन  नामदेव थोरात व संचालक मंडळाने  1 लाखापर्यंत विनातारणी कर्ज फक्त 12 टक्के व्याजाने रेडयुसिंग पद्धतीने 6 .38 % व्याजाने देण्याचे धोरण घेतलेले आहे.  कर्जदारास कर्जाची परतफेड रोजच्या धंद्यातून जमा करणार्‍या डेली वरून होणार आहे . त्यासाठी दोन वर्षाची मुदत दिलेली असून कर्जदारास दोन वर्षाला फक्त 12 हजार 745  रुपये व्याज भरावे  लागणार आहे . यामुळे व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची उपलब्धता होणार आहे . संस्थेच्या 13 शाखांमधून  कर्ज वितरणाचे वाटप सुरु आहे. हे कर्ज घेण्यासाठी संस्थेला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे  संस्थेचे मुख्य कार्यकारी दतात्रय लंके यांनी सांगितले.