Breaking News

लोकल रेल्वे सेवेचा लवकरच निर्णय

मुंबई ः लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प आहे. त्यातच लोकल सेवाही बंद आहे. मुंबईतल्या बर्‍याच कर्मचार्‍यांना आपल्या कामावर जाण्यासाठी लोकल सेवा हा एकच पर्याय आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली लोकल सेवा आज किंवा उद्या अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या नागरिकांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढच्या आठवड्यापासून लोकल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात अत्यावश्यक सेवेतील कामगारांची ने-आण करण्यासाठी लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं केली होती. हा लोकल प्रवास सर्वांसाठी राहणार नसून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठीच रेल्वे प्रवासास मुभा राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.