Breaking News

रामदेवबाबांच्या कोरोना औषधावर महाराष्ट्रात बंदी

- ठाकरे सरकारचा रामदेवबाबा यांना मोठा दणका


योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील औषध कोरोनिल हे आता बंदीच्या कचाट्यात सापडले आहे. कारण आयुष मंत्रालयाने जाहिराती थांबवल्यानंतर आधी राजस्थान, मग आता महाराष्ट्र सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. कोरोनिल या औषधाची वैद्यकीय चाचणीबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिल औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. 

मुंबई/ प्रतिनिधी
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जगात कोरोनावर ठोस कोणतेच औषध तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध निर्माण केलेचा दावा करण्यात आला आहे. पंतजलीने कोरोनावर ’कोरोनिल’  हे औषध तयार केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन हे औषध बाजारात आणले. मात्र, पंतजलीसह रामदेवबाबा यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे. त्याआधी या करोनावरील औषधांवर राजस्थान सरकारने बंदी होती.