Breaking News

तिढा सूटणार : जामखेड पंचायत समिती सभापती निवड ३ जूलैला!

जामखेड / यासीन शेख
अनेक घडामोडी नंतरही तब्बल पाच महिन्यांपासून रिक्त असलेल्या जामखेड पंचायत समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार तीन जूलै रोजी होणार असून सभापती पदाचा तिढा सुटणार आहे. 
 सभापतीपदाचे आरक्षण महिलेसाठी  निश्चित करण्यात आले आहे. पंचायत समिती समितीच्या सभागृहात११ ते ३ या वेळेत कर्जत प्रांताधिकारी अर्चना नष्टे या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पंचायत समितीच्यस राजश्री मोरे व मनिषा सुरवसे या दोनच महिला सदस्या आहेत. या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. 
आडीच वर्षे सभापती पदाची मूदत संपल्यानंतर पूढील कालावधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात १२ डिसेंबर  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्य़ातील चौदाही पंचायत समितीच्या सभापती पदाचे सोडणीद्वारे आरक्षण घोषित झाले होते. त्यात जामखेडला अनुचित जमाती करिता सुटले होते. मात्र या प्रवर्गाचा एकही सदस्य जामखेड पसला नाही  याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले त्यावर ग्रामविकास खात्याचे मार्गदर्शन मागवत ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात चारही पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थित पून्हा आरक्षणाची सोडत काढण्यात आली तेव्हा नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला अशा तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या त्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण निघाले यानंतर जिल्हाधिकारी यांनी जामखेडसह चौदा तालुक्यांच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया ७ जानेवारी रोजी घोषित केली. त्यानुसार जामखेड पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांच्या उपस्थितीत सभापती पदासाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे माळी यांनी निवडणूक प्रक्रिया दि ८ रोजी घेण्याचे घोषित केले परंतु त्या दिवशी फक्त राजश्री मोरेंचा सभापती पदासाठी तर उपसभापती पदासाठी मनिषा सुरवसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या मूदतीत राजश्री मोरे यांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे सभापती पद रिक्त राहिले आणि उपसभापती पदी मनिषा सुरवसे यांची निवड झाली. मागील पाच महिन्यांपासून जामखेडचे सभापतीपदाचा प्रभारी कारभार उपसभापती मनिषा सुरवसे पहात आहेत. आता सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला.