Breaking News

कराची शेअर बाजारात दहशतवादी हल्ला


- बलूच लिबरेशन आर्मीचे चार दहशतवादी ठार
- अंदाधुंद गोळीबारात पोलिस अधिकार्‍यासह चार जवान शहीद

कराची/वृत्तसंस्था
कराची येथील स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीत (शेअर बाजार) घुसून दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबार व बॉम्बस्फोटात एका पोलिस उपनिरीक्षकासह चार सुरक्षा जवान शहीद झालेत तर तीन पोलिस अधिकार्‍यांसह सात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, दोन नागरिकही मारले गेले आहेत. या दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरले असून, कराचीसह मोठ्या शहरात हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा दलाला चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले असून, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या बलूच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.