Breaking News

कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन? - महाराष्ट्रातील सिरो सर्व्हेचा रिपोर्ट जाहीर




मुंबई/प्रतिनिधी
भारतात कोरोना व्हायरसचे कम्युनिटी ट्रान्समिशन तर झाले नाही हे तपासण्यासाठी देशभरात सिरो सर्व्हे केला जातो आहे. देशभरातील 83 जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सिरो सर्व्हेचा अहवाल सरकारने जारी केला आहे.
राज्यातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा या सिरो सर्व्हेत समावेश होता. त्यामध्ये एकूण 2385 नमुन्यांपैकी फक्त 27 नमुने पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये कोरोनाविरोधी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली नाही, असे राज्य सरकारने सांगितले. दरम्यान, आयसीएमआरनेदेखील भारतात कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेले नाही, असे स्पष्ट केले आहे.
 
काय आहे सिरो सर्व्हे?
एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झालेली असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडीज तपासण्यासाठी ब्लड सीरम टेस्ट केली जाते. सिरो सर्व्हे अंतर्गत हीच टेस्ट करण्यात आली. ज्यामुळे किती लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार झाल्यात आणि कोरोनाव्हायरसचे संक्रमण किती प्रमाणात झाले आहे, याची माहिती मिळण्यास मदत झाली.
 
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या
सिरो सर्व्हे रिपोर्टनुसार, राज्यात अद्याप तरी कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचे दिसत नाही. मात्र राज्यातील रुग्णआंची आकडेवारी मात्र वाढते आहे. सोमवारी राज्यात दिवसभरात अडीच हजारांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 2786 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 110744 झाली आहे. गेले काही दिवस राज्यात सातत्याने अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. राज्यात आतापर्यंत 4128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला  आहे.