Breaking News

महाराष्ट्रासह दहा राज्यात घरोघरी सर्वेक्षण

नवी दिल्ली/वृत्तसंस्था
देशात दिवसागणित कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्न असून, त्या खालोखाल इतर राज्यांचा क्रमांक लागतो. याच पृष्ठभूमीवरकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 10 राज्यात घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे.
देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 10 राज्यातील 38 जिल्ह्यात तातडीची चाचणी आणि आवश्यक ती निगराणी ठेवली जाणार आहे, असेआरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. यामुळे संसर्ग आणि मृत्यू दर रोखण्यास मदत होईल, असा विश्‍वास मोदी सरकारला आहे. आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध 45 महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.