Breaking News

संदीप पाटील फाउंडेशनचे काम प्रेरणादायी : आ.लंके

निघोज/प्रतिनिधी : माजी सरपंच संदीप पाटील यांचे लोकाभिमुख लोकविकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी संदीप पाटील फाउंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ व त्यांचे सर्व सहकारी अतोनात परिश्रम घेत आहेत. संदीप पाटील फाउंडेशनचे काम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.
आमदार निलेश लंके यांनी संदीप पाटील संपर्क कार्यालयास भेट दिली. त
सेच संदीप पाटील फाउंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांचा वाढदिवस निमित्ताने सत्कार केला. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद, उद्योजक सुरेश धुरपते, पारनेर येथील उद्योजक विजू औटी, जी एस महानगर बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पासाहेब लामखडे, युवानेते अनिल गंधाक्ते, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे तसेच संदीप पाटील फौंडेशनचे सदस्य संदीप पाटील युवामंचचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार लंके यावेळी म्हणाले, गेली तीन साडेतीन वर्षात सामाजिक कामांच्या माध्यमातून संदीप पाटील फाउंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांनी जनसामान्यांमध्ये सामाजिक वलय निर्माण केले आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात सक्रीय राहील्यास त्याची परिणीती चांगली होते हे सचिन पाटील यांच्या कार्यावरून दिसत आहे. संदीप पाटील यांनी आठ ते दहा वर्षाच्या दरम्यान मोठया प्रमाणात विकासकामे केली. म्हणून गावचा नावलौकीक जिल्ह्यात झाला. त्यांचेच अनुकरण सचिन पाटील व त्यांचे सहकारी करीत असून अशाप्रकारे अनुकरणीय काम करण्याची गरज असल्याचे आवाहन आमदार लंके यांनी केले आहे. यावेळी संपर्क कार्यालयास भेट देउन वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केल्याबद्दल संदीप पाटील फाउंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांनी आमदार लंके व त्यांच्या सहकार्‍यांचे आभार मानले. संदीप पाटील युवामंचचे पदाधिकारी निलेश घोडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.