Breaking News

वाळूमाफियांनी ग्रामीण नदीकाठ पोखरले!

- शेकडो ब्रास वाळूची चोरटी वाहतूक सुरु- घोड नदीचे पात्र वाळूतस्करांनी पोखरले


प्रमोद आहेर/ येळपणे
श्रीगोंद्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन व्यस्त आहे. याचा फायदा घेउन वाळू तस्कर घोड नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा करीत आहेत. रात्रीच्या वेळी घोडनदी शहराचा नदीकाठ तर वाळूतस्करांचा बिझनेस बनत चालला असून, वाळूतस्करांनी नदी पोखरत चालली आहे.
राज्यात व अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे लोकांना घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले असताना दुसरीकडे घोड नदीवरील वाळू चोरांनी मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ,माळवाडी, म्हसे, याठिकाणी चोरटी वाळू वाहतूक केली जाते. घोडनदीचे पत्रात पाणी  असल्यामुळे वाळूमाफिया रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाळू उपसा करत आहेत. नागरिकातून बोलले जात आहे की, अशा वाळूमाफियांना रात्री कोणी विचारत नाही का ? असे एखादा शेतकरी आपल्याच शेतीमधील माळवे घेऊन आला तरी त्याला लगेच विचारले जाते व गाडी अडवली जाते. गाडीत काही आहे की चौकशी केली जाते. परंतु, वाळूमाफियांना कोणी विचारत नाही. तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील वाळू बंद करण्याच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे नागरिकांच्या निदर्शनास आले. तसेच बोटींमार्फत मार्फत वाळूचा साठपा केला जातो. भरदिवसा या भागातून वाहतूक केली जाते आणि या वाळूमाफियांना कोणीही अडवू शकत नाही का ? असे जनतेतून प्रश्‍न विचारले जातात.
रात्रभर घोड नदीच्या कडेला वाळूमाफिया  वाळचा साठा करून घेत असतात व दिवस उजडला की  वाळू वाहतूक चालू केली जाते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या भागात राहणार्‍या नागरिकांना या वाळू माफियांचा रात्री त्रास होत आहे. भविष्यात या वाळूमाफियामुळे या भागात अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या वाळू माफियांचा पोलीस व महसूल प्रशासन यांनी बंदोबस्त करावा अशी या भागात राहणार्‍या नागरिकांतून केली जात आहे.

प्रशासनातील काही अधिकार्‍यांना हाताशी धरून अगदी दिवसाढवळ्या हा वाळूउपसा बिनधास्तपणे सुरू असतो. ही जबाबदारी पोलीस आणि महसूल प्रशासनाची आहे. नदी पत्रातील अवैध वाळू उपसा रोखावा व  या वाळू माफियांना वेळेस रोखावे अशी मागणी होत आहे. तरीही रात्री बारा ते पहाटे पाचपर्यत तस्कर अवैध वाळूचा उपसा करीत आहेत. वाळूचे लिलाव करण्यास मनाई केली आहे. यामुळे वाळूची टंचाई भासू लागली आहे. वाळूला सोन्याचा दर मिळत असल्यामुळे कमी वेळेत जास्त पैसा मिळत असल्यामुळे शहर व तालुक्यात मोठया प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू उपशाविषयी माहिती मिळताच पोलिस, महसूल अधिकारी अर्थपूर्ण संबंधातून किरकोळ कारवाई करतात व कारवाई करून पुढे गेल्यावर ते वाळूमाफिया वाळू चोरीला सुरवात करतात.  महिन्यात टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाळूमाफियांना रात्रीच्या वाळूने भरलेल्या गाडे बेभान होऊन पळवले जातात व त्यातून काही तर अनर्थ होण्याचा धोका निर्माण होण्यापासून रोखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासन आणि महसूल यांची आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह व जिल्हााधिकारी राहुल दिवेद्री  यांनी कडक पावले उचलावीत, अशी मागणी  नागरिक व ग्रामस्थातून होत आहे.