Breaking News

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात

देहरादून/वृत्तसंस्था
भारत चीन सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. देहरादून येथील सैन्य अकादमीमध्ये शनिवारी पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले होते. तेथेते बोलत होते.
चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमा पूर्णपणे नियंत्रणात आहेत, याचे मी आश्‍वासन देतो. तसेच, चीनसोबत आमची कमांडर स्तरावरील बैठकीचे सत्र सुरू आहे, असे नरवणे म्हणाले. याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चा सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही नरवणे यांनी स्पष्ट केले. नेपाळसोबत सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. आमचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध आहेत. दोन्ही देशांच्या लोकांना एकत्र जोडण्यासाठी आमच्याकडे चांगल्या व्यक्ती आहे. आमचे संबंध कायम उत्तम होते आणि भविष्यातही राहतील, असेही नरवणे यांनी स्पष्ट केले.
सकाळी पावणे सातच्या सुमारास सर्व कॅडेट्स आयएमएच्या मैदानावर पोहोचले होते. त्यानंतर परेड सुरू झाली. सर्वप्रथम डिप्टी कमांडेंट यांनी परेडला सलामी दिली. त्यानंतर कमांडेंट लेफ्टनंट जनरल जयविर सिंह नेगी यांनी परेडची सलामी स्वीकारली. त्यानंतर, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी परेडचे निरीक्षण केले. भारताच्या 333 कॅडेट्सने आपलेप्रशिक्षण पूर्ण केले. यासोबतच 90 परदेशी कॅडेट्सही यात सहभागी झाले होते. त्यांनीदेखील आयएमएमधून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. कोरोना संकटादरम्यानपार पडलेल्या परेडमध्ये प्रोटोकॉल पूर्णपणे पाळले गेले. तसेच कॅटेड्सनेमास्क परिधान करून परेड केली. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. या परेडचे युट्यूबर थेट प्रक्षेपण करण्यात आलेहोते. यावेळी नरवणे यांनी कॅडेट्सच्या कुटुंबीयांना संबोधितही केले. आजवर ही तुमची मुलेहोती, आता ती आमची झाली आहे, असे ते यावेळी म्हणाले. तसेच अकादमीच्या इतिहासात प्रथमच कॅडेट्सच्या कुटुंबीयांच्या त्यांच्या गणवेशावर स्टार लावता आले नसल्याचेही दिसले.