Breaking News

पारनेरची चिंता वाढली, पुन्हा एक पॉझिटिव्ह

 - उर्वरीत २६ जणांचे अहवाल येणे बाकी
 - नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह,
           
शशिकांत भालेकर/ पारनेर - 
पारनेर तालुक्यातील सुपा येथील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या ३६ जणांना प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी १० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील एका महीलेचा अहवाल पॉझिटिव्ह
आला आहे तर नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित २६ जणांचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.त्यातील मृत महिलेच्या घरातील एका महीलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने सुपेकरांची चिंता वाढली आहे.
       चार दिवसांपुर्वी मयत  झालेली ५६ वर्षीय महीला  कोरोना पॉझिटिव्ह आसल्याचे गुरुवारी सकाळी निष्पन्न होताच सुपा बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. अहमदनगर- पुणे महामार्गावर सुपा हे शहर आसुनही आत्तापर्यंत  सुरक्षित होते.  सुपा येथील एका ५६ वर्षीय महीलेचे मंगळवार दि.२३ जुन रोजी निधन झाले. ती आजारी आसल्याने तीला सुपा येथील एका खाजगी रुगणालयात उपचार चालू आसताना तिचे निधन झाले. तिला दम्याचा त्रास होता असे त्यांच्या परिवाकडून सांगण्यात येत होते.मात्र गुरुवारी सकाळी तिचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांचाच हदयाचा ठोका चुकला व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. निधन झालेला महीलेचे नातेवाईक  तीच्या आंतविधिला उपस्थित आसलेले नातेवाईक व ती ज्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होती तेथील डॉक्टर व कर्मचारी यांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रथम पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.नंतर  त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
     ती मृत महिला ज्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली होती ते रूग्णाल शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आले आहे. मृत महीलेच्या  कुटुंबीयांनी चार दिवस आगोदर एक जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.तेव्हांही खुप संबंधित लोकांनी त्या परिवाराच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. सुप्यात पहिल्यांदाच स्थानिक रहवाशी रुग्ण सापडला व त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या महिलेचा अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाला असून तिचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने सुपा व परिसरातील नागरिकांची धडधड वाढली आहे.
     तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपा शहरात सुमारे १२ ते १३ गावातील नागरीकांची ये-जा असते.प्रशासनाच्या वतीने लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते.कोरोनापासून बचाव करण्यासाठी कुठल्याही प्रकारे उपाययोजना केल्या जात नव्हत्या.सुपा शहरात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित २६ जणांच्या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.