Breaking News

जिजामाता इयत्ता १० वी चा निकाल 100 टक्के !

जिजामाता इयत्ता १० वी चा  निकाल 100 टक्के  !

पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर येथील आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फौंडेशन संचालित जिजामाता सेमी इंग्लिश स्कूल पारनेर या विदयालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे 
या विद्यालयाने सलग 14 वर्षे हि परंपरा कायम ठेवली आहे.
 या विद्यालया तील कु. शिवानी सतिश कावरे ९०.२० % प्रियंका दत्तात्रय पडवळ   ८३ .८o % प्रज्ञानंद  संघर्ष गणकवार ८१.८० % प्रियंका पोपट दिवटे ८१ .४० % या विद्यार्थ्यांनीं विद्यालयात प्रथम चार मध्ये बाजी मारली आहे.
 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता संस्थेमार्फत वर्षभर नवनवीन उपक्रम राबवले जातात यापुढे ही विद्यालयाच्या 100% निकालाची परंपरा कायम राखण्याचा संस्था प्रयत्न करील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सादिक राजे यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विदयार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आनंद मेडिकल अँड  एज्युकेशन फौडेशन चे संस्थापक डॉ सादिक राजे, विदयालयाचे मुख्याध्यापक  संतोष ठाणगे ,संस्थेचे संचालक फहाद राजे ,व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले .