Breaking News

मवेशी आश्रम शाळेचा निकाल 100% लागला !

मवेशी आश्रम शाळेचा निकाल 100% लागला        
          
  राजूर प्रतिनिधी :-  
       शासकिय माध्यमिक आश्रमशाळा मवेशी प्रकल्प राजूर येथील शाळेचा निकाल 100% लागला असून या शाळेचे आठ विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.52 विद्यार्थ्यांपैकी एकूण 23 विद्यार्थी हे डिस्टिंक्शन मध्ये 24 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये व 5 विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये पास झालेले आहेत. अजय भाऊ शिंदे हा विद्यार्थी 92.2% घेऊन शाळेत प्रथम आला तर अविनाश दीपक बांगर 88.6% घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला. करटुले प्रियंका 84 %, नाडेकर कोंडू 82% ,दीक्षा भांगरे, सुनील गावंडे  व आशिष तीगळे यांनी प्रत्येकी 80 %टक्के मिळवलेले आहेत. 
     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मा. संतोष ठुबे साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवराज कदम सर, सर्व मवेशी ग्रामस्थ, वर्गशिक्षक नेहे सर शातलवार सर,पोकळे मॅडम, शेख मॅडम, धामणे मॅडम, निमरोठ सर, ढगे मॅडम, मुंडे मॅडम, अधीक्षक यादव सर अधीक्षिका डोंगरे नाही सर्व कर्मचारी व मवेशी संकुल येथील सर्व व्यवस्थापक प्रमुख व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.