Breaking News

मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, रिपाई नेते अशोक गायकवाड सह 10 जणांवर गुन्हा दाखल !

मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, रिपाई नेते अशोक गायकवाड सह 10 जणांवर गुन्हा दाखल
नेवासा तालुका प्रतिनिधी :
तालुक्यातील गिडेगांव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवे घेण्या हल्ल्याची चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराचा शोध घ्यावा व सदर
प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास करावा या मागणीसाठी दि.17 रोजी तहसील  नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांचे 10 जणांवर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा पोलिस ठाण्यातील पो.कॉ. प्रतापसिंह भगवान दहिफळे (वय 30 वर्ष) यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की,
दि.13 जुलै 2020 रोजी रविंद्र राजू भालेराव व इतर तिन यांनी मौजे गिडेगांव ता.नेवासा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवे घेण्या हल्ल्याची चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराचा शोध घ्यावा व सदर प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास करावा या मागणीसाठी दि .17/07/2020 रोजी तहसील कार्यालये नेवासा येथे  मोर्चा काढणे बाबत पोलीस स्टेशन नेवासा व तहसीलदार यांना समक्ष निवेदन दिले होते.
त्याअनुषंगाने तहसीलदार यांनी रविंद्र राजू भालेराव व इतर 3 यांना कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोर्चा मध्ये सदर आजाराची इतरांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपआपसांत सुरक्षित अंतर राहावे म्हणून गर्दी,यात्रा मेळावे व इतर
यावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून  जिल्हाधिकारी  यांनी कलम 144 सबब उपरोक्त बाबी
लक्षात घेता दि.17/07/2020 च्या मोर्च्याची परवानगी नाकारण्यात येत असून नियोजित मोर्चा पुढे
ढकलण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा असा आदेश निवेदनकर्ते रविंद्र भालेराव व इतर 3 यांना संदर्भ
क्र-कावी/दंडव्य/कोरोना/मोर्चा/644/2020 दि. 14/07/2020 रोजी काढण्यात आला होता.तसेच सदर
निवेदन कर्त्यांना नेवासा पोलीस स्टेशनच्या जावक क्र.213 वतीने दि.16/07/2020 रोजी सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या होत्या. 
निवेदन कर्ते यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नोटीस बजावून देखील  त्यांनी
दि.17/07/2020 रोजी 12:15 वा.ते 13:25 वा. पर्यंत 1)रविंद्र राजू भालेराव रा.नेवासा फाटा 2)अशोक
रामचंद्र गायकवाड रा.चांदा ता.नेवासा ह.रा अ.नगर 3)सुशिल दिगंबर धायजे रा.नेवासा फाटा 4)सुनिल
योहान वाघमारे रा.शिरसगांव ता.नेवासा 3)दयानंद बापूराव खिलारी रा.नेवासा फाटा 6)विजय शंकर गायकवाड रा.करजगांव ता.नेवासा 7)जाकीर सलीम शेख रा.नेवासा खुर्द 8)प्रवीण संतोष साळवे रा.नेवासा फाटा 9)सुरेंद्र थोरात रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी 10)शामराव सोनकांबळे व इतर 106 ते 140 पुरुष व महिला यांनी अशोक रामचंद्र गायकवाड यांचे नेतृत्वाखाली नेवासा बस स्टॅड येथे एकत्रित जमून पायी नेवासा तहसील कार्यालयाच्या बाजूस असलेल्या मोकळ्या पटांगणात येवून सदर ठिकाणी एकत्र
जमून भाषणे करून जिल्हाधिकारी  यांचे कडील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून सोशल
डिस्टसिंगचे चे पालन न करता तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा
1887 च्या अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी जिविताला व आरोग्याला किंवा
सुरक्षिततेला धोका पोहचेल असे कृत्य केले. या फिर्यादीवरून वरील मोर्चाकर्ते यांचे विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम 188,269 ,270 व मुंबई पोलीस अधिनियम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे तसेच महाराष्ट्र कोविड-19 चे उपाययोजना
2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.