Breaking News

शासकीय आदर्श आश्रम शाळेच्या 10 वी च्या निकालात मुलींची बाजी.

शासकीय आदर्श आश्रम शाळेच्या 10 वी च्या निकालात मुलींची बाजी.
राजूर प्रतिनिधी :
   शैक्षणिक संकुल मवेशी येथील महाराष्ट्रातील नाशिक विभागातील  पाच जिल्ह्यातून आश्रम शाळेतून स्पर्धा परिक्षा व्दारे  निवडलेल्या 40 विद्यार्थ्यांना या शाळेत इ.5 वी ला  प्रवेश दिला जातो.आदिवासी  विद्यार्थ्यांतून  हुशार प्रज्ञावंत  विद्यार्थी निर्माण होऊन डाॅक्टर, इंजिनिअर व प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावेत या उद्देशाने 1989 सालापासून      विद्यानिकेतनच्या धर्तीवर आदश॔ आश्रम शाळा भंडारदरा कॅप मवेशी  ही शाळा  सुरू करण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभागा मार्फत चालवल्या जाणार्या या शाळांची या वर्षी 25 वी बॅच होती . या वर्षी मार्च 2020 च्या एस.एस.सी च्या परीक्षेत शासकीय आदर्श आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशी या शाळेने आपल्या 100% निकालाची परंपरा कायम राखली असून ,एकुण 31 विद्यार्थ्यांपैकी 10 विदयार्थी डिस्टिंग्शन मध्ये, तर 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.
कु.कातडे प्रतीक्षा 86.00%  
 कु. वासले तेजश्री 83.60%
 कु कामडी अनिता 83.60% 
 चि. गिर्हे सागर वसंत 83.00%
 कु.उघडे रेश्मा     81.60%
 कु. बागुल वंदना    81.60%
 कु. पडवळे गीतांजली 80.60%

 या प्रमाणे प्रथम सात विद्यार्थीनींनी क्रमशः गुण मिळवले असून नेत्र दिपक यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्याचे प्रकल्प अधिकारी श्री. संतोष ठुबे, तसेच शाळेचे कुलप्रमुख श्री.भाऊसाहेब खरसे व श्री.आदिनाथ सुतार, श्री.शिवाजी नरके, श्रीम. सुमन सहाणे, श्री.अंकुश चावडे, श्री.जगनाथ जाधव, इ. शिक्षक वृद तसेच शाळेचे अधीक्षक श्री. समाधान सुर्यवंशी, अधिक्षिका श्रीम. रंजना जगधने, अतिथी शिक्षक, श्री. स्वप्नील सोनवणे, श्री. नामदेव डगळे, श्री.प्रसाद पिचड, गृहपाल श्री.सुधीर सांगळे,  श्री अनिल जोशी,(व.लिपिक ) व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी चे अभिनंदन केले आहे.