Breaking News

देवळाली प्रवरात एक रुग्ण कोरोना बाधित सापडला, रुग्णांची संख्या 11 वर पोहचली !

देवळाली प्रवरात एक रुग्ण कोरोना बाधित सापडला, रुग्णांची संख्या 11 वर पोहचली !
देवळाली प्रवरा प्रतिनिधी :
              देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत वैद्यकीय क्षेञाशी संबधित एक जण कोरोना बाधित आढळला आहे. नगर पालिका एकुण 11 कोरोना बाधित आढळले आहेत. तीन रुग्णांना उपचारा नंतर मंगळवारी घरी सोडण्यात आहे.
                   याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर पालिका हद्दीतील जुना गणेगाव रस्ता लगत राहणाऱ्या वैद्यकीय संबधित  एकास कोरोना बाधीत असल्याचा अहवाल आला आहे देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत रुग्णांची संख्या 11 वर पोहचली आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या घराजवळ लाँकडाऊन करण्यात आले आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ  व मुख्याधिकारी  अजित निकत  कोरोनावर  दिवसराञ काम करीत असून कोरोना बाधित यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना खाजगी किंवा सरककारी प्रयोगशाळेत स्ञाव तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले परंतू नागरीकांकडून प्रतिसाद मिळत नाही. बाधित व्यक्तीच्या  संपर्काचा शोध घेवून त्या नागरीकांना  स्ञाव तपासणीसाठी बळजबरीने न्यावे लागत आहे. 
                      बाधित 11 रुग्णांपैकी राहुरी कारखाना येथील तीन रुग्ण उपचार घेवून घरी आले आहेत. 8 रुग्णांवर उपचार चालू आहे.  आरोग्य अधिकारी  व नगर पालिकेच्या वतीने  नागरीकांनी घरी रहा ,सुरक्षित रहा, सामाजिक अंतर पाळा  आवाहन करण्यात येत आहे.