Breaking News

वारणवाडी येथे वीज पडून 11 शेळ्या मृत्युमुखी !

वारणवाडी येथे वीज पडून 11 शेळ्या मृत्युमुखी !
पारनेर प्रतिनिधी - 
 पारनेर तालुक्यातील वारणवाडी ता.पारनेर येथे दि 23 जुलै रोजी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास रानामध्ये मध्ये शेळ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला त्यात वीज पडून 11 शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत जवळपास अडीच लाख रुपयाचे नुसकान झाले आहे याबाबत पंचनामा करण्यात आला आहे.
दि 23 जुलै रोजी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणवाडी येथेल हांडेवाडा परिसरात शेळ्या चारायला गेल्या असता मेंढपाळ पोपट कोंडीबा हांडे राहणार वारणवाडी  (हंडेवाडा) हे रानामध्ये शेळ्या चारत असताना अचानक पाऊस व वारे सुरू झाले त्यातच शेळ्यांच्या अंगावर वीज पडून या 11 शेळ्या जागीच दगावल्या आहेत. 
    संततधार पाऊस नसतानाही रात्री अकरा च्या सुमारास पंचनामा करण्यात आला यावेळी टाकळी ढोकेश्वर चे पशुधन अधिकारी डॉ. नितीन गाडीलकर डॉ.गंगाधर धरम, सरपंच गंगुबाई हरिभाऊ पिंगळे, तलाठी येवले ग्रामसेवक प्रशांत आहिरे उपस्थित होते.
वीज पडून 11 शेळ्या मृत्युमुखी पडल्या मुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुस्कान झाले आहे त्याला शासकीय पातळीवरून मदत मिळावी अशी मागणी परिसरात व्यक्त होत आहे.