Breaking News

सुपा येथे 12 जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने कब्जात असताना, पोलिसांनी केली जनावरांची सुटका !

सुपा येथे 12 जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने कब्जात असताना, पोलिसांनी केली जनावरांची सुटका
--------
68 हजार रु चा मुद्देमाल जप्त सुपा पोलिसांची कारवाई
पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील सुपा येथील संभाजीनगर दौलत पेट्रोल पंपामागे 12 जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने एका टेम्पोला बांधलेल्या अवस्थेत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 31 रोजी पहाटे पाचच्या सुमारास सुपा येथील संभाजीनगर दौलत पेट्रोल पंपामागे 12 जनावरे हे कत्तल करण्याचे उद्देशाने आरोपी आबिद नजीर शेख वय-24   रा. संभाजीनगर सुपा ता-पारनेर  जि- अहमदनगर हा पोलिसांना मिळून आला 12 जनावरे किंमत 68000 रु पोलिसांनी ताब्यात घेतले असून पो हे. आर. एस पटेल सुपा पोलीस स्टेशन ता -पारनेर जि- अ.नगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून महाराष्ट्र अँनिमल प्रिझर्वेशन अँक्ट कलम 5(ब)व 9 प्राण्याचा छळ प्रती. अधि.सन 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. चौधरी करत आहेत.