Breaking News

अकोल्यात कोरोना चा कहर एकाच दिवशी आढळले 14 पॉझिटिव्ह रुग्ण !

अकोल्यात कोरोना चा कहर एकाच दिवशी आढळले 14  पॉझिटिव्ह रुग्ण !
तालुक्यात कोरोनाने शंभरी ओलांडली !
अकोले/ प्रतिनिधी
 अकोले तालुक्यात  आज एकाच दिवशी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे एकाच दिवशी जास्त रुग्ण संख्येचा हा आज विक्रमी आकडा नोंदविला गेला. तालुक्यात  रुग्ण संख्येने आज शंभरी पार केली आहे.
   काल मंगळवारी अकोले तालुक्यात दिवसभरात चार  कोरोना बाधित  आढळले होते यात तालुक्यातील जांभळे येथील ६१ वर्षीय महीला, बदगी बेलापुर येथील ४७ वर्षीय पुरूष तर  कोतुळ येथील ५१ वर्षीय पुरूषाचा  व  खाजगीतील औरंगपूर  येथील २२ वर्षीय तरुण यांचा समावेश होता तर आज बुधवारी  तालुक्याला करोनाचा हादरा देणारी घटना समोर आली.
तालुक्यातील माणिका ओझर येथे  १० ,राजुर येथे  दोन, वाघापुर येथे एक  निब्रळ एक अशी १४ जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतुन  दिलेल्या  अहवालात सकाळीच तालुक्यातील माणिक ओझर येथील चार  पुरुष तीन महिला व तीन   लहान मुलांसह एकूण  १० जण तर राजुर येथील ६० व ३० वर्षीय पुरुष,वाघापुर येथील ४५ वर्षीय पुरुष व निब्रळ येथील २१ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
  तालुक्यात रुग्णांची एकुण संंख्या ११० झाली आहे. त्यापैकी ६६ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर ४१ जणांवर उपचार सुरु आहे.असल्या चे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंद्रजित गंभिरे यांनी  यांनी दैनिक लोकमंथन ला सांगितले.