Breaking News

पारनेर तालुक्यात कोरोना चा शिरकाव 24 उच्चांकी बाधित संख्या !

पारनेर तालुक्यात कोरोना चा शिरकाव 24 उच्चांकी बाधित संख्या

रुई छत्रपती आरोग्य केंद्राने रॅपिड च्या माध्यमातून केलेल्या चाचणीत कोरोना बधितांची उच्चांकी संख्या

कोरोना चा  वाढता आलेख हा तालुक्यासाठी चिंतेचा विषय
 पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा वाढता आलेख हा प्रशासनासाठी व तालुक्यातील नागरिकांसाठी हा चिंतेचा विषय होत चालला आहे आज दि.31 रोजी अचानक तालुक्यातील कोरोना ची संख्या ही धक्कादायक वाढली आहे
रॅपिड किट च्या माध्यमातून करण्यात आलेल्या चाचणी मधून ही संख्या 17 बाधित व्यक्ती समोर आल्या आहे तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना संशयित व्यक्तींची रॅपिड चाचणी करण्याचे काम सध्या सुरू आहे  त्यामुळे तालुक्यात अजूनही संख्या वाढण्याची शक्यता आहे. होत असलेल्या चाचणीमुळे संशयित लोकांना वेळीच उपचार मिळणार असून त्यामुळे पुढील धोका टळला जाईल.
 तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रावर रॅपिड कीट पुरविण्यात आलेले आहेत तालुक्यात रॅपिड किटच्या माध्यमातून संशयित रुग्णांची तपासणी करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे यामध्ये रुई छत्रपती आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी गुंजाळ त्यांच्या पथकाने दिवसभर रॅपिड टेस्ट माध्यमातून तपासणीची मोहीम राबवली यात 242 व्यक्तींची रॅपिड चाचणी करण्यात आली त्यामध्ये 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 225 अहवाल निगिटिव्ह आले आहेत.
दिवसभरामध्ये सुपे 12 पाडळी दर्या 2 म्हसोबा झाप 2 भनगडेवाडी 1 ढवळपुरी 1 तिखोल 2 दैठणे गुंजाळ 1 हिवरे कोरडा 1 कान्हूर पठार 1 रायतळे 1 या गावातील एकूण  24  व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
डॉ अश्विनी गुंजाळ यांनी आपल्या भागातील संशयित कोरोना बाधित व्यक्तींची रॅपिड किट च्या माध्यमातून तपासणी केली त्याबद्दल तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्यांचे कौतुक केले आहे मात्र तालुक्यातील इतर आरोग्य केंद्रावर असणारे आरोग्य अधिकारी यांनी आपली कामाची क्षमता वाढून संशयित लोकांची रॅपिड किट चाचणी केली पाहिजे.
जिथे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रुग्ण येण्याची शक्यता आहे अशा कंटेनमेंट झोनमध्ये वयोवृद्ध व्यक्ती गरोदर महिला बीपी शुगर किडनी आजार यासारख्या विविध व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती खाजगी वैद्यकीय दवाखान्यात गेलेले संशयित रुग्ण यांच्या सुद्धा रॅपिड किट च्या माध्यमातून तपासण्या करण्याचे सांगण्यात आले आहेत तसेच डॉ. ठुबे व डॉ. औटी व काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोरोना संशयित रुग्ण शोधण्यास प्रशासनच मदत केलेली आहे.

रुई छत्रपती आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी गुंजाळ यांनी दिवसभरामध्ये संशयित रुग्णांची युद्धपातळीवर तपासणी केली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्ती शोधण्यात प्रशासनाला यश आले व त्यांना वेळीच पुढील उपचारासाठी दाखल केले जाणार आहे त्यामुळे डॉ अश्विनी गुंजाळ यांचे तहसीलदार यांनी अभिनंदन केले आहे तसेच तालुक्यातील इतर आरोग्य केंद्रावर असणारे आरोग्य अधिकारी यांनी अद्याप समाधानकारक काम केले नाही त्याबद्दल खंतही व्यक्त केली आहे सर्वांनी डॉ. अश्विनी गुंजाळ यांच्यासारखे काम केल्यास तालुक्यातील संशयित रुग्णांचे वेळीच विलगीकरण करण्यात येईल व तालुक्यातील कोरोना पासून होणारे मृत्यू रोखता येतील असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले