Breaking News

पारनेर तालुक्यात पुन्हा 2 कोरोना बाधित तालुक्यात दिवसभरात एकूण 12 कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात पुन्हा 2 कोरोना बाधित तालुक्यात दिवसभरात एकूण 12 कोरोना बाधित !

दैठणे गुंजाळ येथील बधितांच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचा कोरोना चाचणी साठी नकार !
-------------------
पारनेर तालुक्यातील पाच गावे तीन दिवसासाठी बंद !
----------
 बाधित रुग्ण आढळलेला भाग चौदा दिवस कंटेन्मेंट झोन घोषित : तहसीलदार ज्योती देवरे

पारनेर तालुक्यात कोरोना बधितांचा आलेख वढतोय !

पारनेर/प्रतिनिधी-  
    पारनेर तालुक्यामध्ये कोरोना ची संख्या झपाट्याने वाढत आहे आज दिवसभरामध्ये कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 12 वर गेली आहे यात राळेगण सिद्धी 6 दैठणे गुंजाळ 2 पोखरी(म्हसोबा झाप) 2 पानोली 1 जवळा 1 या गावातील बाधित रुग्ण आहेत त्यामुळे हे गाव तीन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे ज्या व्यक्ती बाधित आढळून आले आहेत त्या ठिकाणचा शंभर मीटर परिसरात 14 दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
    पारनेर तालुक्यात दि 20 रोजी सकाळी प्रायव्हेट लॅबच्या अहवालामध्ये म्हसोबा झाप येथील दोन जण दैठणे गुंजाळ व जवळा येथील प्रत्येकी एक जण असे चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर पुन्हा संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये राळेगणसिद्धी येथील सहा जणांचे व पानोली दैठणे गुंजाळ येथील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह निघाला आहे त्यामुळे दिवसभरात तालुक्यात कोरोना बाधित संख्या 12 वर गेली आहे हा तालुक्यातील आरोग्य विभाग व प्रशासन यासाठी चिंतेचा विषय झाला आहे.
दैठणे गुंजाळ येथील कोरना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 8 व्यक्तीना कोरोना चाचणी घेण्यासाठी प्रशासनाने संपर्क केला मात्र त्या लोकांनी कोरोना चाचणी स्राव देण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
  जे संपर्कात आलेले व्यक्ती स्राव देण्यासाठी नकार देतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून कोरोना चाचणीसाठी स्राव देण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे स्राव घेतल्यानंतर त्या व्यक्तींनी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये थांबणे बंधनकारक आहे मात्र या व्यक्ती लगेच घरी जाण्याचा आग्रह करतात मात्र ते न करता त्यांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये थांबावे जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला व इतर त्यांच्या संपर्कात येणार्‍यांना धोका निर्माण होणार नाही
दरम्यान राळेगणसिद्धी येथील काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये असलेल्या एक जणांचा कोरणा मुळे मृत्यू झाला होता.
  त्यानंतर राळेगण-सिद्धी येथून एक जण मुंबई येथे गेला होता व त्यासोबत मुंबई येथे त्या कुटुंबातील पाच जण व हा एक असे सहा जण पुन्हा  दि 18 रोजी राळेगणसिद्धी येथे आली होते त्यांना राळेगणसिद्धी येथे आल्यानंतर राळेगणच्या ग्राम सुरक्षा समितीने संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते त्यानंतर त्यांची कोरोना चाचणीसाठी स्राव घेण्यात आले ते अहवाल आज प्राप्त झाले आहेत त्यात 6 जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे राळेगण-सिद्धीकरांन बरोबरच तालुक्याची धकधक वाढली आहे.