Breaking News

संगमनेर तालुक्यात कोरोना घोडदौड सुरूच, आज मिळाले 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

संगमनेर तालुक्यात कोरोना घोडदौड सुरूच, आज मिळाले 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !
संगमनेर/प्रतिनिधी :
      संगमनेर तालुक्यात कोरोनाची घोडदौड सुरूच असून आज (गुरुवार दि.२३) तब्बल बावीस नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज खाजगी आणि शासकीय रॅपिड अँटीजेन चाचणीतून २२ नवे रुग्ण समोर आले आहेत. यात संगमनेर शहरातील १० रुग्ण, कसारा दुमाला येथील ९ रुग्ण तर गुंजाळवाडी पठार, वाघापूर आणि दाढ खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.            संगमनेर शहरातील जेधे कॉलनी, भारत नगर, नवीननगर रस्ता, पद्मानगर येथील प्रत्येकी एक तर जनता नगर, गणेशनगर आणि मालदाड रोड परिसरातील प्रत्येकी दोन रुग्णांचा आजच्या यादीत समावेश आहे. यासह तालुक्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ४७८ इतकी झाली आहे. असे असले तरी यातील फक्त १८० रुग्ण कोरोनावर उपचार घेत असून आज चार रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.