Breaking News

निघोज येथील गुटका कनेक्शन पुन्हा उघड 28 हजार रुपयांचा गुटखा जप्त,अन्न व प्रशासन विभागाची कारवाई !

निघोज येथील गुटका कनेक्शन पुन्हा उघड  28 हजार रुपयांचा गुटखा जप्त,अन्न व प्रशासन विभागाची कारवाई !
 पारनेर प्रतिनिधी - 
   तालुक्यातील निघोज येथून किराणा मालाच्या दुकानातून 26 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे याबाबत फिर्याद अन्न व प्रशासन अधिकारी शरद मधुकर पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 20 रोजी संध्याकाळी 6.20 च्या सुमारास संदीप हरिचंद्र कवाद वय 30 वर्ष राहणार तनपुरे वस्ती, पिंपरि जलसेन रोड, निघोज गावठाण, तालुका पारनेर,याच्या कवाद बंधू, किराणा स्टोअर्स, या दुकानात आरोपी यांनी शासनाची परवानगी नसताना 26400 चे विमल पान मसाला, व्ही वन तंबाखू साठवणूक करताना अन्न व प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये आढळून आला अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच आरोपी प्रवीण शहाजी वराळ वय 35 वर्ष राहणार माऊली फर्टीलायझर दुकाना मागे, गणेश मंडळ समोर, वडनेर रोड , निघोज, याच्या वडाळा पान शॉप या दुकानातून 1812 रु किं चे हिरा पान मसाला,  रॉयल तंबाखू , विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला हा माल अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला आढळून आला या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शेलार करत आहेत.