Breaking News

डॉ.सुनिल शिंदे यांच्या कडून अंजनापुरात अर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वाटप !

डॉ.सुनिल शिंदे यांच्या कडून अंजनापुरात अर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वाटप
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
कोपरगाव  तालुक्यातील जवळके येथील डॉ.सुनिल शिंदे व डॅा तेजस्विनी शिंदे यांच्याकडून अंजनापुर येथील नागरिकांसाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधांची मोफत वाटप करण्यात आले.भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविल्यानुसार प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अल्बम सैनिक अर्सेनिक अल्बम हे औषध प्रभावी ठरत आहे.
अर्सेनिक अल्बम ३० औषध आयुष मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड १९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे असे नमूद केले आहे. डॅा शिंदे दापंत्याने वाळकी,बहादराबाद,बहादरपुर,अंजनापुर या गावामध्ये या गोळ्यांचे मोफत वाटप केले आहे.परिसरातील सर्व गावामध्ये एक सामाजिक काम म्हणुन ह्या गोळ्यांचे वाटप आम्ही करत आहे.नागरीकांनी विनाकारण घराबाहेर फिरु नये,मास्क व सॅनिटाझरचा वापर करत जावा असे अहवान यावेळी डॅा सुनिल शिंदे यांनी केले.
यावेळी डॅा रमेश पाचोरे, तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.