Breaking News

पारनेर ग्रामीण रुग्णालयात 38 बेडचे कोविड हॉस्पिटल, पारनेर तालुक्यातील खाजगी डॉक्टरांनी राबवला अभिनव उपक्रम !

पारनेर ग्रामीण रुग्णालयात 38 बेडचे कोविड हॉस्पिटल   
पारनेर तालुक्यातील खाजगी डॉक्टरांनी राबवला अभिनव उपक्रम

तालुक्यात एका ठिकाणी ठेवण्यात येणार कोरोना बाधित रुग्ण

कोविड रुग्णांसाठी मालेगाव पॅटर्नप्रमाणे डाॅक्टर उज्वल कापडणिस यांचा ओम शांतीवर आधारित  musical yoga व राजयोग मेडिटेशन वर्ग

या वर्गाचा शुभारंभ आज आमदार निलेश लंके व प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत होणार

ग्रामीण रुग्णालयातील इतर सुविधा खाजगी हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार निशुल्क सुविधा!
शशिकांत भालेकर पारनेर/तालुका प्रतिनिधी :
      पारनेर येथे कोविड हॉस्पिटल ची सुविधा सुरू करण्यात आली आहे कोविड हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ठेवण्यात येणार आहे यापूर्वी खाजगी रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून ताब्यात घेण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा विभागली जात होती मात्र पारनेर तालुका मेडिकल असोसिएशन व डॉक्टर असोसिएशन च्या पुढाकाराने या हॉस्पिटल साठी लागणाऱ्या सुविधा पुरवण्यात आल्या त्यामुळे हे शासकीय ग्रामीण रुग्णालयात हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे त्यामुळे एकाच ठिकाणी 38 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे येथे सुपा कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 21 कोरोना बाधित रुग्णांची रवानगी करण्यात आली आहे हे रुग्ण आता पारनेर येथे पारनेर तालुक्यातील डॉक्टरांच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
      तालुक्यातील सुपा दोन खाजगी रुग्णालय कोविड सेंटर म्हणून ताब्यात घेतली होती मात्र तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुक्यात अनेक ठिकाणी खाजगी  हॉस्पिटल कोविड रुग्णालय म्हणून ताब्यात घ्यावी लागली असती वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल सुरू करण्यात आल्यानंतर तेथे लागणारा डॉक्टर्स नर्स व आदी आरोग्य कर्मचारी हा स्टाफ उपलब्ध कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यावर पर्याय म्हणून पारनेर येथे एकाच ठिकाणी हॉस्पिटल मध्ये 38 बेड तयार करण्यात आले येथे अजूनही गरज पडल्यास बेड वाढवता येऊ शकतात त्यामुळे एकाच ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना एकाच जागेवर सर्व सुविधा मिळणार आहे आरोग्य कर्मचारी कमी प्रमाणात लागतील येथील जागा मोठी असल्यामुळे व हवेशीर असल्यामुळे रुग्णांचे आरोग्य व मानसिक संतुलन चांगले राहील याठिकाणी रुग्णांना योगासने आयुर्वेदिक काढे होमिओपॅथिक औषधे देता येऊ शकतात सर्व डॉक्टरा च्या सहकाऱ्यांनी सर्व बाधित पेशंटची देखरेख व उपचार एकाच ठिकाणी व्हावी तालुक्यात अनेक भागांमध्ये जर हॉस्पिटल करण्यात आली असती तर त्या ठिकाणी लागणारी आरोग्य यंत्रणा अपुरी पडली असती पारनेर येथे एकाच ठिकाणी हॉस्पिटल केल्याने तेथे तेवढी आरोग्य यंत्रणा उपलब्ध होऊ शकते येथे शासकीय आरोग्य अधिकारी प्रमाणे खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टर येथे सेवा देणार आहेत.
तसेच तालुक्यातील सुपा येथील दोन हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आली होती मात्र तिथे इतर पेशंट येणे बंद होते त्यामुळे इतर पेशंटला औषध उपचार व इतर सुविधा मिळावी म्हणून हि हॉस्पिटल खाजगी रुग्णांसाठी सुरू करण्यात येतील त्या ठिकाणी इतर पेशंटला सुरक्षितता मिळणार आहे
ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोना बधितांसाठी हॉस्पिटल सुरू करण्यात आल्यामुळे येथे येणाऱ्या सर्व गरीब गरजू रुग्णांसाठी पारनेरमधील खाजगी डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा पुरवणार आहे  कोविड हॉस्पिटल साठी डॉ.श्रीकांत पठारे डॉ.बाळासाहेब पठारे डॉ. आर. जी.सय्यद डॉ.संदीप औटी डॉ.बाळासाहेब कावरे डॉ.विजय जगताप आदींचे सहकार्य लाभले आहे.

   असोसिएशनच्या वतीने Tulsimmune या गोळ्या देण्यात येतील याठिकाणी कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी लागणारा बरासा खर्च असोसिएशनच्या माध्यमातून उचललेला आहे असोसिएशनच्या माध्यमातून अजूनही रुग्णांसाठी जे करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू खाजगी तालुक्यातील डॉक्टर यासाठी मदत करत आहेत
-----
डॉ अजित लंके 
अध्यक्ष 
पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन 

    तालुक्यात एका ठिकाणी सर्व डॉक्टर एकत्र येऊन कोविड हॉस्पिटल सुरू करावी अशी संकल्पना मांडली होती त्यानुसार सर्वांनी त्यास अनुमोदन दिले काही दिवसापासून आम्ही जागा शोधत होतो तशी व्यवस्था असलेली जागा मिळाली नाही म्हणून ग्रामीण रुग्णालयात कोविड बेडची व्यवस्था तयार करण्यात आली आहे तेथील सर्व खर्च सामाजिक भावनेतून आम्ही सर्व डॉक्टरनीं केला आहे सध्या ऑक्सिजन सुविधा तेथे करण्यात आली आहे गरज पडल्यास व्हेंटिलेटर व अतिरिक्त बेडची व्यवस्था आम्ही सर्व डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात येईल !
-----
डॉ. श्रीकांत पठारे
(पंचायत समिती सदस्य पारनेर)

     हे हॉस्पिटल म्हणजे कोरोना रुग्णांची मानसिक आणि आरोग्याची काळजी घेणार केंद्र बनवायचा आहे !
कोरोना रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य कसे चांगले राहील त्यांना सकारात्मक ऊर्जा कशी मिळेल कोरोना बाधित रुग्णांसाठी म्युझिकल योगा घेण्याचा संकल्प आहे त्यातून त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभेल हे हॉस्पिटल म्हणजे कोरोना रुग्णांची मानसिक आणि आरोग्याची काळजी घेणार केंद्र बनवायचा आहे मेडिकल ट्रीटमेंट सोबतच खाजगी डॉक्टरांनी त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी उपक्रम सुरू केले ते बघून मनस्वी आनंद होत आहे तालुक्यावर आलेल्या आपत्ती हि आपली आपत्ती समजून त्यांनी पुढाकार घेतला डॉ.श्रीकांत पठारे व डॉ.संदीप पठारे यांनी इतर डॉक्टरांशी चर्चा करून कमी वेळामध्ये सर्व तयार केले त्यामुळे त्यांचे प्रशासनाच्या वतीने आभार मालेगाव मध्ये डॉ कापडणीस यांनी राबवलेला म्युझिकल योगा व राजयोग मेडिटेशन वर्ग येथे घेतले जाणार आहे.
------
ज्योती देवरे 
तहसीलदार पारनेर

    खाजगी हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार निशुल्क सुविधा!
ग्रामीण रुग्णालयात हॉस्पिटल सुरू करण्यात आल्यामुळे तेथे शवविच्छेदन व मेडीकोलिगल केसेस या सेवा देण्यात येतील या व्यतिरिक्त प्रसूती सर्पदंश जनरल ओपीडी या सर्व सेवा-सुविधा  खाजगी हॉस्पिटलमध्ये निशुल्क देण्यात येतील त्यामध्ये डॉ. श्रीकांत पठारे ओंकार हॉस्पिटल पारनेर येथे प्रसूती गरोदर स्त्रियांची तपासणी व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अत्यावश्यक व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया डॉ.बाळासाहेब पठारे ओंकार हॉस्पिटल सुपा येथे सर्पदंश विषबाधा अपघात डॉ. आर जी सय्यद आनंद हॉस्पिटल पारनेर येथे जनरल ओपीडी आय.पी.डी श्वानदंश डॉ. संदीप औटी औटी हॉस्पिटल पारनेर येथे जनरल ओपीडी आय. पी.डी.श्वानदंश डॉ. बाळासाहेब कावरे विघ्नहर्ता हॉस्पिटल पारनेर येथे जनरल ओपीडी आय.पी.डी श्वानदंश डॉ.विजय जगताप निरामय हॉस्पिटल सुपा येथे सर्पदंश विषबाधा अपघात या सुविधा रुग्णांना मोफत पुरवण्यात येणार आहेत.