Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात आज सापडले 4 रुग्ण एकुण रुग्णसंख्या झाली 106 !

श्रीगोंदा तालुक्यात आज सापडले 4 रुग्ण एकुण रुग्णसंख्या झाली 106 
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी - 
    श्रीगोंदा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे तर  बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत आहे ही श्रीगोंदा तालुकासाठी आनंदाची  गोष्ट म्हणावी लागेल काल दिवसभरात 6 रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर आज तालुक्यातील काष्टी-2, खरातवाडी-1, बनपिंप्री-1असे  एकूण 4 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता -106 झाली असून दिवसभरात 17 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे आता तालुक्यात एकूण 24 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी दिली आहे तरी सर्वानी काळजी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे