Breaking News

कोळगाव येथे 45 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण.

कोळगाव/प्रतिनिधी 
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी आणखी एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने कोळगाव परिसरात तसेच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
          श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील पांढरेवाडी याठिकाणी  तीन दिवसांपूर्वी ५५ वर्षीय वृध्द महिला कोरोना पोजिटिव्ह निघाली असताना आज दि.३ जुलै रोजी आणखी एक ४५ वर्षीय तरुण एक कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कोळगाव परिसर तसेच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण कोळगाव परिसर प्रशासनाकडून सील करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले असून. त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना कोरोंटाईन करण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत याचा आरोग्य विभाग कसून शोध घेत आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र दक्षता घेणे गरजेचे आहे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांनी यावेळी केले आहे.