Breaking News

पोखरी येथील 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या !

पोखरी येथील 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर तालुक्यातील पोखरी येथे 45 वर्षीय व्यक्तीने घराच्या पत्र्याच्या लोखंडी पाइपला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत पोखरी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून आत्महत्या च्या पाठीमागेचे कारण अस्पष्ट आहे.
      आण्णा बुधमल वाकळे वय- 45 रा. पोखरी तालुका पारनेर  जि अ.नगर याने दि. 26 रोजी सकाळी सहाच्या पूर्वी घराच्या पत्र्याच्या खालील लोखंडी पाइपला पांढरे नायलॉनच्या दोरीच्या पट्टीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे याबाबतची माहिती किशोर चांगदेव वाळके यांनी पारनेर पोलीस स्टेशनला कळवली त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.