Breaking News

रिलायन्सकडून ‘जिओआत्मनिर्भर 5-जी’ची मोठी घोषणा

- 2021पासून मिळणार ग्राहकांना सुविधा

नवी दिल्ली/वृत्तसंस्था
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 43व्या एजीएमची बैठक पार पडली असून, मुकेश अंबानींनी मोठी घोषणा केली आहे. अंबानींकडून जिओ 5-जी रोडमॅपचे अनावरण करण्यात आले. ही सुविधा 2021मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, इतर देशांमध्येसुद्धा ही सेवा सुरू करणार असल्याचे मुकेश अंबानींनी जाहीर केले. भारताला विकसित बनवण्यासाठी ही सुविधा जागतिक स्तरावर पोहोचवण्याची हीच वेळ असल्याचेही अंबानी म्हणाले.
जिओने अगदी मुळापासून संपूर्ण 5-जी सोल्यूशन डिझाइन केले आणि विकसित केले आहे. स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यावर मेड इन इंडिया टेक्नॉलॉजी एका वर्षात उपयोजित आणि लाँच केली जाऊ शकते. जिओ आपले 4 जी नेटवर्क सहजपणे 5-जी श्रेणीवर नेणार आहे, कारण ते सर्व आयपी नेटवर्क आर्किटेक्चर आहे. जिओ प्लॅटफॉर्म ’आत्मनिर्भर भारत’साठीचे महत्त्वाचे उदाहरण ठरेल, असेही अंबानी म्हणाले आहेत.  या घोषणेमुळे बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत जवळपास दीड टक्क्यांनी वाढून 2000 रुपयांवर गेली होती. यापूर्वी मंगळवारी हे शेअर्स 1917 रुपयांवर बंद झाले होते.