Breaking News

पारनेर मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 50 बेड चे कोविड हॉस्पिटल !

पारनेर मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  वाढदिवसानिमित्त 50 बेड चे कोविड हॉस्पिटल 
पारनेर तालुका शिवसेनेचेच्या वतीने  मुख्यमंत्र्या च्या वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम
पारनेर-प्रतिनिधी  - 
शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे  यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने सोमवार दि. २७ जुलै रोजी पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पारनेर मध्ये ५० बेडचे कोव्हिड रुग्णालयाचे लोकार्पण विधानसभेचे मा. उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, तहसिदार  ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले राजेंद्र गवळी गटविकास अधिकारी किशोर माने मुख्याधिकारी डॉ सुनीता कुमावत आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे डॉ उदरे डॉ श्रीकांत पठारे डॉ बागल यांचे उपस्थितीत केले जाणार आहे. अशी माहिती जि. प. बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर व सभापती गणेश शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. पारनेर तालुक्यात प्रथमच ऑक्सिजन सोयीसुविधा सह अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार असून गरज पडली तर हे अद्ययावात बेड वाढविण्यात येतील असेही उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले व तालुका प्रमुख विकास रोहकले यांनी सांगितले आहे.तर दुसरीकडे रक्तदानासह सामाजिक उपक्रमांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवस साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांनी केले होते. त्या आवाहानाला प्रतिसाद देत शिवसेनेच्या वतीने सोमवार दि. २७ जुलै रोजी पारनेर येथील बाजारतळावरील आंबेडकर भवनात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवानेते अनिकेत औटी व युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके यांनी दिली आहे. तसेच पारनेर तालुक्यातील गावागावात कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर पारनेर शिवसेना पक्षाच्या वतीने १ लाख मास्कचे व ५० हजार सॅनिटायजरचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमुख निलेश खोडदे, नगराध्यक्षा सौ. वर्षा नगरे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट व विजय डोळ यांनी दिली आहे. तरी या कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतुने अनेक सामाजिक उपक्रम राबवून करण्यात येणार आहे.