Breaking News

पारनेर तालुक्यात पुन्हा 6 व्यक्ती कोरोना बाधित दिवसभरात दहा जण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात पुन्हा 6 व्यक्ती कोरोना बाधित दिवसभरात दहा जण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यात दि २६ जुलै रोजी प्राप्त झालेल्या खाजगी लॅब च्या अहवालानुसार भाळवणी दोन सुपा, हंगे, गोरेगाव, राळेगण थेरपाळ प्रत्येकी एक   व्यक्ती असे एकूण दहा अहवाल कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे  अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
दि.२६  जुलै रोजीचा आत्तापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा 10 वर गेला आहे. सकाळी धोत्रे येथील एक व्यक्ती राळेगण  थेरपाळ तीन व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत.
पारनेर तालुक्यातील आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०० पार गेली आहे, कोरोना बाधित रुग्णांचा तालुक्यातील वाढता आलेख हा चिंतेचा विषय होत आहे.
 कोरोना बाधित व्यक्ती आढळलेल्या शंभर मीटर परिसरात  कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे असे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.