Breaking News

पाडळी दर्या येथील 68 वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू !

पाडळी दर्या येथील 68 वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू !
पारनेर प्रतिनिधी- 
      पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील 68 वर्षीय एक व्यक्ती कोरोना बाधित होती  नगर येथे उपचार घेत असताना त्या व्यक्तीचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्यांचा अंत्यविधी नगर येथेच करण्यात आला आहे.
   पाडळी दर्या येथील स्थानिक व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे हा व्यक्ती आठ दिवसापासून आजारी होता त्याला काही प्रमाणात शारीरिक व्याधी होत्या त्याने काही काळ कान्हूर पठार येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतले त्यानंतर नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते तिथे त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील 8 लोकांचे स्राव कोरोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्याचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत तर त्यांच्या शेजारच्या एका व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव प्राप्त झाला आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणीसाठी स्राव घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू आहे. पाडळी दर्या गाव पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे.