Breaking News

कोरोना बाधित हंगा येथील 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू , तर दैठणे गुंजाळ येथे नवीन 3 कोरोना बाधित !

कोरोना बाधित हंगा येथील 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू , तर दैठणे गुंजाळ येथे नवीन 3 कोरोना बाधित !
------
तालुक्यात दिवसभरात कोरोना बाधितांची संख्या चार वर
-----
पारनेर तालुक्यातील  17 अहवाल निगेटिव्ह
पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना संख्या वाढत आहे. हंगे येथील  कोरोना बाधित व्यक्तीचा  सुपा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. तर दैठणे गुंजाळ येथील एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे त्यांच्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार निष्पन्न झाले आहे
या कुटुंबातील एक व्यक्ती दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळली होती. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांचा चाचणीसाठी स्राव घेण्यात आला होता. त्यात तीन जणांना कोरोना ची बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे दि 27 रोजी तालुक्यातील 17 अहवाल निगेटिव्ह आले आहे यात पाडळी दर्या 7 वाळवणे 5 खडकवाडी 3 सुपा 2 या गावाचा समावेश आहे.
हंगा येथील 73 वर्षीय व्यक्ती ही सुपा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. तेथे तिची कोरोना चाचणी करण्यात आली तो अहवाल काल रात्री पॉझिटिव आला होता. रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर तिचा अंत्यविधी हा नगर येथेच करण्यात आला.
कुटुंबातील संपर्कात आलेल्या सात व्यक्तींची कोरोना चाचणी साठी स्राव घेण्यात आले आहे ते अहवाल प्रलंबित आहेत.
ही महिला स्थानिक होती तरी तिला कोरोनाची ची बाधा झाली
त्यामुळे आता तालुक्यात कोरोना च्या समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. यापुढील काळामध्ये प्रत्येक नागरिकाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच गरज नसताना घराबाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.