Breaking News

हंगे येथील मयत ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा जावई कोरोना बाधित !

हंगे येथील मयत ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा जावई कोरोना बाधित !
----
प्रशासन घरी रॅपिड टेस्टसाठी गेले तरी कुटुंबातील व्यक्तींनी केला विरोध
----
पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा आरोग्य कर्मचार्‍याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न
पारनेर प्रतिनिधी-  
    पारनेर तालुक्यातील हंगे येथे ७३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता त्या कुटुंबातील व्यक्तींची प्रशासनाने रॅपिड किट ने टेस्ट केली त्यामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे।
हंगे येथे ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता ती महिला हंगे येथील असल्याने तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींची चाचणी करण्यात आली त्यामध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मयत महिलेच्या कुटुंबातील आठ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती ह्या  कोरोना चाचणी करण्यासाठी टाळाटाळ करत  होते. म्हणून प्रशासनाने थेट त्यांच्या घरी  रॅपिड टेस्ट किट  घेऊन जात घरीच या लोकांची चाचणी केली त्यापैकी एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला आहे. हा व्यक्ती चाचणी घेण्यासाठी गेलेल्या प्रशासनाला सहकार्य न करता पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य अधिकार्‍यांच्या थेट अंगावर येण्याचा प्रयत्न केला यातील एक व्यक्ती हंगे येथील उपसरपंच आहे  मला जर कोरंटाईन साठी नेले तर मी आत्महत्या करेल व पथकावर दगड फेकेल असे तपासणी साठी आलेल्या पथकास  उपसरपंच बोलले त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती मयत होऊनही लोकांचे डोळे उघडणार नसतील तर उघड आहे
तर प्रशासनाने सांगूनही या कुटुंबातील दोन जण हे श्रीगोंदा येथे गेले आहेत.
तर कुटुंबातील व्यक्तीने केलेल्या असहकारा बाबत पोलिसांना माहिती दिलेली आहे पोलीस याबाबत पुढील कारवाई करत आहेत दोघेजण श्रीगोंदा येथे फरार झाले आहेत तसेच तेथील तहसीलदारांना कळविण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे 
संबंधित व्यक्तींना पारनेर लेडीज होस्टेल येथेल कोविड सेंटर मध्ये सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना ग्रामपंचायत हंगे यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान हंगा येथील व्यक्ती बाधित आढळला आहे हा मृत व्यक्तीचा जावई आहे व तो दि 16 जुलै रोजी मुंबईहुन गावी आला होता मात्र तो गावी आल्याचे कोणाच्याही निदर्शनास आले नाही व त्याने ही माहिती लपवून ठेवली त्यानंतर आज केलेल्या टेस्टमध्ये हा बाधित आढळला आहे
    सर्व ग्राम सुरक्षा समित्यांनी मुंबई पुणे किंवा इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना गावातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवावे वृद्ध व्यक्तींना अशा लोकांच्या संपर्कात येऊ देऊ नये जर कोणाला कोरोनाचे लक्षणे दिसले तर तातडीने दवाखान्यामध्ये आणावे जेणेकरून मृत्यू रोखता येईल कसे अवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले.