Breaking News

पारनेर पोलिसांनी जवळ्यात 75 हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्‍त, पोलिसांची धडक कारवाई !

पारनेर पोलिसांनी जवळ्यात 75 हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्‍त !
 पारनेर/प्रतिनिधी :
    पारनेर तालुक्यातील जवळा येथे पारनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
 18/07/2020 रोजी राहुल पोपट सालके सुदाम शंकर पठारे दोघे रा जवळा ता पारनेर यांनी गटारी अमावशेच्या पार्श्वभूमीवर बांधकाम चालू असलेल्या घरात  देशी विदेशी दारुचा मुद्देमाल आणून ठेवल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळताच उपविभागीय अधिकारी श्री अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी व पोलिस उपनिरीक्षक बोत्रे यांच्या पथकाने जवळा ता पारनेर छापा टाकून  एकूण रुपये 75030 रुपये मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेऊन पारनेर पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले आहे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
 गटारी अमावस्या च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आल्यामुळे अवैध दारू व्यवसायिकांना या कारवाईमुळे लगाम बसेल.