Breaking News

अकोल्यातील वाघापूर येथे आढळला करोना पॉझिटिव्ह संख्या पोहचली 80 वर !

अकोल्यातील वाघापूर येथे आढळला करोना पॉझिटिव्ह संख्या पोहचली 80 वर
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वाघापूर येथे आज करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या  ८0  झाली आहे.
अकोले तालुक्यात मुळा परीसरातील वाघापुर गावातील २८ वर्षीय तरुणाचा आज शासकीय रुग्णालय अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
  तालुक्यात रुग्णांची एकुण संंख्या  ८० झाली आहे त्यापैकी ६१ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर १६ जणांवर उपचार सुरु आहे.
अकोले तालुक्यात करोना  संसर्ग आता  वाढत आहे करोना शी गेल्या चार महिन्यापासून लढा देणाऱ्या महसूल यंत्रणेवर करोना ने मात केली आहे 
करोना ने थेट अकोले तहसील कार्यालयात प्रवेश केला आहे तहसील कार्यालयातील कर्मचारीच बाधित सापडल्याने प्रशासन हादरले आहे.

काल शनिवारी अकोले.तहसिल कार्यालयातील एका  कर्मचाऱ्यांसह  धुमाळवाडी रोडवरील  ५१ वर्षीय महिला व धुमाळवाडी येथील १५ वर्षीय मुलगा तर तालुक्यातील माणिकाओझर येथील ६५ वर्षीय वृद्ध आणि ३५ वर्षीय पुरूष अश्या पाच व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. ते तर आज वाघापूर येथे एक रुग्ण आढळल्याने करो ना पिच्छा सोडण्यास तयार नाही असे दिसून येत आहे.