Breaking News

कु.ऋतुजा प्रशांत होन 94.40% गुण मिळवून विद्यलयात प्रथम !

कु.ऋतुजा प्रशांत होन 94.40% गुण मिळवून विद्यलयात प्रथम !
 बेलापूर / प्रतिनिधी : 
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवार दि.29 जुलै 2020 रोजी घोषीत झाला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.ऋतुजा प्रशांत होन हीने 94.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
         विद्यालयातून दहावीच्या परीक्षेस बसलेल्या 182 विद्यार्थ्यां पैकी 173 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा शेकडा निकाल 95.05% इतका लागला आहे. 94.40% गुण मिळवून कु.ऋतुजा प्रशांंत होन हीचा विद्यालयातून प्रथम क्रमांक आला आहे. त्याचप्रमाणे चि.सुमेध विलास कोकणे हा 93.60% गुण मिळवून द्वितीय तर 90.00% गुण मिळवून चि.यश संजय पवार हा तृतीय क्रमांकाणे उत्तीर्ण झाला आहे.
        वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदयसिंह पाटील , उपाध्यक्ष शामराव निमसे , सेक्रेटरी महेश पाटील , अधिक्षक पारखे , प्राचार्य बाळासाहेब जुंद्रे , सोपान मगर , श्रीमती जाधव , श्रीमती अढाव  , सौ.चव्हाण एस.बी., सौ.चव्हाण यू.एस., वारुळे बी.एन., गायकवाड यू.एन., प्रशांंत होन , कोळसे एस.पी., चव्हाण एस.टी., आरंगळे ए.एन.,शिंदे पी.बी., तांबे आर.एल. आदींनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.