Breaking News

श्री ढोकेश्वर विद्यालयाचा 98.54 टक्के निकाल.

श्री ढोकेश्वर विद्यालयाचा 98.54 टक्के निकाल.
 टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील  श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.54%टक्के लागला असून, परीक्षेस एकूण 137 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह 75, प्रथम श्रेणीत43, द्वितीय श्रेणीत 15,  तृतीय श्रेणीत 2 जण पास झालेत.
     कु.अवंतिका सुधाकर जाधव हिने 97.40% टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे ,   कु. ज्ञानेश्वरी आनंदा बुचुडे हिने 96.60% टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे , कु. साक्षी शिवाजी गुंजाळ 96.40% गुण मिळवून तृतीय, कु. सायली मंचरे हिने 95.20%  टक्के गुण मिळवून चौथी आली  तर कु. ज्ञानेश्वरी थोपटे हिने 95% गुण मिळवून पाचवा  क्रमांक पटकावला. 90% पेक्षा जास्त गुण मिळवून 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
    या गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य श्रीधर झावरे, पर्यवेक्षक रज्जाक इनामदार, प्रा. बाळासाहेब निवडुंगे, अमोल ठाणगे, राहुल झावरे, बाबासाहेब जाधव, श्रीमती वैशाली गायखे,  श्रीमती शोभा गायकवाड,  श्रीमती रेणुका श्रीगादी,  श्रीमती निलम  खिलारी,  श्रीमती वर्षा शेळके, निलेश जासूद, चित्रकार नारायण शेळके,  यांचे मार्गदर्शन लाभले.
   सर्व गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमारजी झावरे,  उपाध्यक्ष रामचंद्रजी दरे,  सचिव जी.डी. खानदेशे,  सहसचिव ऍडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम आण्णा खिलारी पाटील, माजी सभापती राहुल भैय्या झावरे पाटील  सर्व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ,  पालक यांनी अभिनंदन केले.