Breaking News

राजूर जवळील माणिक ओझर येथे 9 रुग्ण कोरोना बाधित !

राजूर जवळील माणिक ओझर येथे 9 रुग्ण कोरोना बाधित !
राजूर प्रतिनिधी :
      राजूर पासून 4 की मी अंतरावर असलेले माणिक ओझर गावात 9 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे तेव्हा राजूर करांनी बेफिकीर राहून चालणार नाही आपली काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर ठेवावे, मास्क चा वापर करावा कारण हे रुग्ण  राजूर मध्ये फिरले असावेत  अकोले  तालुक्याची रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर जाताना दिसत आहे. एकुण रुग्ण संख्या ९२ झाली आहे.
दिवसभरात एकूण १३ व्यक्ती कोरोना बाधित !
अकोले तालुक्यात सकाळी वाघापुर येथील २८ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्यानंतर राञी अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील अहवालात तालुक्यातील १२ जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह अला आहे.यामध्ये माणिक ओझर येथील ०९ गोडेवाडी (केळी) येथील ०२ तर रेडे गावातील एक व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.गोडेवाडी येथील ४० वर्षीय पुरूष ३५ वर्षीय महिला, रेडे येथील २२ वर्षीय तरुण तर माणिक ओझर येथील ५८ वर्षीय, ६० वर्षिय,२८ वर्षीय,२२ वर्षीय महीला २५ वर्षीय पुरुष व ११ वर्ष,०८ वर्षीय, ०४ वर्षीय, ०२ वर्षीय मुली अश्या एकुण तालुक्यातील १२ जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभीरे यांनी दिली आहे.
  तालुक्यात रुग्णांची एकुण संंख्या  ९२ झाली आहे त्यापैकी ६१ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर २८ जणांवर उपचार सुरु आहे.
अकोले करांनी सावधान काळजी घ्या ! विनाकारण बाहेर फिरू नका.! घरी रहा सुरक्षित रहा.