Breaking News

बेलापूरात एकाच कुटुंबातील आढळले 9 जण कोरोनाबाधित, ग्रामस्थांमधे खळबळ !

बेलापूरात एकाच कुटुंबातील आढळले 9 जण कोरोनाबाधित ! ग्रामस्थांमधे खळबळ !
बेलापूर प्रतिनिधी :
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एकाच कुटुंबातील 9 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने बेलापूरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोहचली त्यांना तातडीने संत लुक हाँस्पीटल येथे दाखल केले आहे.
        श्रीरामपूर येथे एका कंपनीत काम करणाऱ्या बेलापुरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल काल प्राप्त झाला असून त्यातील 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे बेलापुरात खळबळ उडाली असून त्या कुटुंबात काही दिवसापूर्वी दु:खद घटना घडली होती. त्यामुळे त्या  कुटुंबाच्या संपर्कात आणखी गावातील व्यक्ती आले असून त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. देविदास चोखर यांनी केली आहे.
          दरम्यान, गावामध्ये एका कुटुंबातील 9 जण बाधीत सापडल्याची चर्चा होताच त्यांच्या संपर्कातील अनेक जण चिंताग्रस्त झाले आहे. बेलापूर येथील एका डॉक्टरचाही अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्या डॉक्टरने पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार केल्याने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी दिले होते. त्याचाही अहवाल प्राप्त झाला असून तोही पाँझीटीव्ह आलेला आहे. त्यानुसार त्या डॉक्टरांच्या घरांच्यांचीही  तपासणी करण्यात येणार आहे.गेल्या तीन दिवसापासून बेलापूर गावात सतत रुग्ण वाढत आहे. रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याचा आदेश असताना अंतर कमी जास्त करुन सोयी नुसार परिसर बंद करत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला असुन काही व्यक्तींचे समीती बरोबर वादही झालेले आहे आता गाव बंद ठेवावे असे काहीचे मत, असुन काही नागरिकांनी बंदलाच विरोध केलेला आहे तसेच परिसर  बंद करताना  २०० मिटरचा नियम असताना काही जण आपल्या मर्जीप्रमाणे अंतर कमी जास्त करुन परिसर सीलबंद करत आहेत. तसेच सीलबंद परिसरातील व्यक्ती बाहेर येवु नये त्या परिसरात असणाऱ्या व्यवसायीकांनी व्यापार व्यवहार कडेकोट बंद ठेवावे असे असतानाही सीलबंद परिसरातील नागरिक रस्त्यावर येतात दुकाने चालु असतात, अशीही काहींची तक्रार आहे. या संकट काळातही काही जण राजकारण करत असल्याचा आरोपही काहींनी केला आहे.