Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात आज एकूण 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह !

श्रीगोंदा तालुक्यात आज एकूण 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 
तालुक्याची एकूण रुग्णसंख्या झाली 178   
 श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी 
 श्रीगोंदा तालुक्यात दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढत असून आज दि 30 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्रीगोंदा शहरात 4 नवीन कोरोना रुग्ण तर तालुक्यातील पिंपळगाव पिसा-1, मुंढेकरवाडी-1, जंगलेवाडी-2, गव्हाणेवाडी-1 असे एकुन 9 रुग्ण वाढले असून तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 178 वर पोहचली आहे.
    त्यातील 50 जण रुग्ण उपचार घेत असून उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आजपर्यंत 2 जणांचा मृत्यु झालेला आहे 77 जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी दिली.