Breaking News

रशियाला मागे टाकत भारत तिसर्‍या क्रमांकावर!

भयंकर! 24 तासांतील आकडेवारीने वाढवली चिंता

नवी दिल्ली/प्रति
निधी 
जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत आता तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताने रशियाला मागे टाकले असून, भारताची पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी ही गेल्या काही दिवसांत सर्वात जास्त आहे. देशाचा पॉझिटिव्ह दर  हा 13.42 टक्के असून, मृत्यूदरही वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्ण हे 20 हजारांच्या वर आहे. गेल्या 24 तासांतही 24 हजार 248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाखांच्या घरात गेला आहे.
सध्या देशात 6 लाख 97 हजार 413 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 2 लाख 53 हजार 287 सक्रीय रुग्ण आहेत. तर 4 लाख 24 हजार 433 रुग्म निरोगी झाले आहेत. तर, एकूण मृतांची संख्या 19 हजार 693 झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 60 टक्क्यांहून जास्त झाला आहे. 7 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत, जेथे 75 टक्क्यांहून  जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. 4 राज्यांत तर 80 टक्क्यांहून जास्त रुग्ण निरोगी झाले आहे. यात चंदीगड सर्वात अव्वल आहे. देशात सध्या कोरोनाचे6 लाख 97 हजार 413 कोरोना रुग्ण आहेत. यासह रशियाला मागे टाकत भारत आता तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. रशियामध्ये कोरोनाचे 6 लाख 81 हजार 251 रुग्ण आहेत. कोरोनाच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत 29 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 17 हजार 244 नवीन प्रकरणे समोर आली. अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख 32 हजार 382 लोकांचा मृत्यू झाला.