Breaking News

अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या तालुका उपाध्यक्ष पदी प्रा.राम सोनवणे यांची निवड !

काष्टी :-
 श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार.राम सोनवणे यांची राज्य पातळीवर काम करणाऱ्या अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद मेहरे यांनी निवडीचे पत्र दिले.
      सदर संस्थेची स्थापना ही प्रामुख्याने समाजात पत्रकारांना मिळणारे स्थान, सामाजिक जडणघडणीत पत्रकारांना व त्यांच्या लेखन साहित्याचा होणारा ऱ्हास, सामाजिक पातळीवर होणारे पतन, नवनिर्मित पत्रकारांना समाजात मिळणारे स्थान, पत्रकाराविषयी  समाजात असणारी विचारधारा, त्यांचे लेखन साहित्य अबाधित राहण्याकरिता भावी पिढीला सकस साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या कौटुंबिक संवर्धनासाठी, समाजातील आर्थिक, दुर्बल व मागासलेल्या वर्गाकरीता तसेच समाजातील इतर घटकाकरिता त्यांच्या विकासाच्या द्रुष्टीने एक सामाजिक प्रयत्न म्हणून संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या नियमांचे पालन करून संस्थेची उदिष्टे व ध्येय धोरणांच्या अधीन राहून कार्य करणार असल्याची माहिती प्रा.राम सोनवणे यांनी दिली.
         यावेळी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष कुमार कडलग, संस्थेचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष विजयसिंह गुंड यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.