Breaking News

पारनेर तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवशी सहा जण कोरोना बाधित

पारनेर/प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यात कोरोना चे सहा रुग्ण बाधित झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पिंपळगाव रोठा येथील मयत झालेल्या वृद्ध महिलेच्या  संपर्कात आलेल्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पारनेर शहरातील कुंभारवाडी येथील एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी  प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
          पारनेर तालुक्यात पिंपळगाव रोठा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले या कुटुंबातील महिलेचा नुकताच अचानक मृत्यू झाला होता त्यावेळी ही महिला कशाने मृत पावली याचे कारण समजले नसले तरी तिला हृदयविकार झटका आला असल्याची माहिती समोर येत होती मात्र नातेवाईक व शेजाऱ्यांच्या आग्रहाखातर व खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा करोना चाचणी साठी 15 जणांचे स्राव घेतला त्यातील10 जणांचा अहवाल निगेटिव आला मात्र पाच जणांचा आज प्राप्त झाला आहे त्यातील पाच लोक बाधित असल्याचे निष्पन्न झाले तसेच पारनेर शहरालगत असणाऱ्या कुंभारवाडी येथील एका जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तो कान्हूर पठार येथील बाधित असलेल्या शिक्षकांच्या संपर्कात आला होता एकाच दिवशी सहा जणांना कोरोना ची बाधा झाल्याचा अहवालात निष्पन्न झाल्या मुळे तालुक्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याची पहिलीच वेळ आहे.
दरम्यान पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील मुंबईहून आलेल्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा दि1 रोजी मृत्यू झाला तिच्या मृत्यू मागचे कारण नेमके काय  हे स्पष्ट झाले नसले तरी तिला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले तर परिसरातील लोकांच्या म्हणण्या नुसार तिला कोरोना सदृश्य लक्षणे असल्याची शंका आहे यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या संपर्कात आलेल्या 15 जणांचे स्राव चाचणीसाठी घेण्यात आले होती त्यातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.