Breaking News

"परिक्रमा" एम.बी.ए महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल !

"परिक्रमा" एम.बी.ए महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल
काष्टी :- 
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील ग्लोबल इनव्हायरमेंट मध्ये उभा असलेल्या मा.ना.श्री बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट च्या परिक्रमा एम.बी.ए महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला. यशाची परंपरा कायम ठेवत एम.बी.ए चा निकाल शंभर टक्के लागला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमावलीला धरून मूल्यमापन केल्यामुळे महेश निजवे प्रथम क्रमांकाने, साईबाबु पाडे द्वितीय तर धवलराज पवार तृतीय, अक्षदा अकोलकर चौथी आली अशी माहिती विभाग प्रमुख प्रा.सुहास पाखरे व परीक्षा प्रमुख प्रा.प्रमोद जाधव यांनी दिली.
        परिक्रमा शैशनिक संकुलात शैशनिक व व्यक्तिविकासात्मक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यास सुलभ होते अशी माहिती एम.बी.ए चे संचालक डॉ.तानाजी दबडे यांनी दिली.
          दर्जेदार शिक्षण व सॉफ्ट स्किल यामुळे आमचे विद्यार्थी कायम यशाची परंपरा ठेवतात अशी माहिती संस्थेचे संचालक श्री.प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.
         सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री.विक्रमसिंह पाचपुते, कॅम्पस डायरेक्टर डॉ.विजय पाटील, फार्मसी प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.अनिल पुंड, तसेच डॉ.सुदर्शन गिरमकर यांनी अभिनंदन केले.
            या उज्वल यशामागे प्रा.गणेश बडदे, प्रा.सागर पाचपुते, प्रा.निसार शेख, प्रा.संदीप निमसे, श्री.सुभाष परकाळे, सौ.शुभांगी ढोबळे यांचे मोठे योगदान आहे असे महेश निजवे यांनी सांगितले.