Breaking News

बेलापूर बदगी येथे चोरट्यांचा डाळिंबाच्या पिकावर डल्ला !

बेलापूर बदगी येथे चोरट्यांचा डाळिंबाच्या पिकावर डल्ला !
अकोले/प्रतिनिधी : 
अकोले तालुक्यातील बदगी- बेलापूर येथील पवारवाडीत शेतकऱ्यांच्या
शेतातून २२ हजार ५०० रुपये किमतीचे ४५ कॅरेटडाळिंब चोरून नेल्याची घटना घडली आहे. विलास दगडू गोपाळे (रा. पवारवाडी, बदगी
बेलापूर) या शेतकऱ्याने अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
की, पवारवाडी शिवारातील सर्व्हे नंबर ४५६ जमिनीतील डाळिंबाच्या  शेतातून शुक्रवारी रात्री १० ते शनिवार सकाळी ६ वाजेच्यापूर्वी अज्ञात चोरट्याने ४५ कॅरेट अंदाजे प्रत्येकी ५०० रुपये कॅरेटप्रमाणे २२ हजार ५०० रुपये किंमतीचे भगवासेंद्री या जातीचे डाळिंब तोडून चोरून नेले. या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर
२२३/२०२० नुसार भारतीय दंड संहिता ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बन्सी टोपले करत आहेत.
----------