Breaking News

पाथर्डीची चिंता वाढली एकाच दिवशी १० कोरोनाबाधित रुग्ण;अजुनही ७१ अहवाल जणांचे अहवाल पेंडीग


पाथर्डीची चिंता वाढली एकाच दिवशी १० कोरोनाबाधित रुग्ण;अजुनही ७१ अहवाल जणांचे अहवाल पेंडीग
पाथर्डी/प्रतिनिधी : 
तालुक्यातील कोल्हार येथील दोन तर शहरातील आझाद चौक येथील आठ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.तालुक्यात आज एकाच दिवशी १० जण कोरोनाबाधित झाल्याने शहराची चिंता वाढली आहे.तर ७१ जणांचे अहवाल पेंडीग असुन ते आज येण्याची शक्यता आहे.
     तालुक्यात आतापर्यंत मोहजदेवढे १,चिंचपूर पांगुळ १,चिंचपूर इजदे ३,चेकेवाडी १,शिरापूर १,खेर्डे ३,आझाद चौक १०,फुलेनगर १,कोल्हार २,त्रिभुवनवाडी १,शिक्षककॉलनी १,वामनभाऊनगर १,पिपळगाव टप्पा १,तिसगाव १ अशा एकूण २८ रुग्णांची नोंद झाली आहे.
                  आतापर्यंत आरोग्य विभागाकडुन २५८ रुग्णांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात असुन,सध्या १७ जणांवर उपचार चालु आहेत.